• Homepage
  • Articles
  • निसर्गातील सरूपता (Camouflage) व अनुकारिकता (Mimicry)

निसर्गातील सरूपता (Camouflage) व अनुकारिकता (Mimicry)

विपुल सृष्टी मध्ये आपण आपल्या आजूबाजूला  असलेल्या निसर्गातील गंमतीजमती बघत आहोत. या  लेखात आपण बघणार आहोत निसर्गातील अनुकरिकता /नक्कल (Mimicry) आणि सरूपता / मायावरण  (Camouflage). प्राणी, पक्षी, कीटक हे सर्वच नक्कल (Mimicry) आणि सरूपता (Camouflage) स्वतःच्या संरक्षणा करिता वापरताना दिसून येतात.

Mimicry ही नैसर्गिक निवडीचे उत्तम उदाहरण आहे. उत्क्रांती होताना प्रत्येक प्रजातीनी स्वतःच्या संरक्षणा करिता काही बदल अंगिकारले. भुकेल्या शिकाऱ्यां पासुन स्वतःचा बचाव करण्याकरता रंग, आकारयात बदल केले. आज आपण अशीच काही उदाहरणं बघणार आहोत. मायावरण म्हणजे प्राणी राहत असलेल्या अधिवासातील एखाद्या वास्तुशी साम्य.

अशा साम्यामुळे प्राण्याचा त्याच्या शत्रूंपासून बचाव होतो.  अनेक प्राणी camouflage करण्यात माहीर असतात. आपल्याला सगळ्यांना सरडा माहीतचआहे. सरडा त्याच्या अधिवासाप्रमाणे रंग बदलतो. स्टिक इनसेक्ट (काडी किडा) हा देखील camouflage चे उत्तम उदाहरण आहे. साप सुद्धा खूप छान पद्धतींनी स्वतःच्या अधिवासाप्रमाणेcamouflage करतात.

Mimicry म्हणजे नक्कल करणे. फुलपाखरां मध्ये mimicry ची अनेक उदाहरणे आहेत. Striped tiger किंवा कॉमन टायगर फुलपाखराच्या पंखावर वाघाच्या अंगावर असतात तसे चक्क पिवळे काळे पट्टे असतात. कॉमन टायगर च्या माद्या Asclepiadoideae (रुई) प्रकारच्या झाडांच्या पानावर अंडी घालतात.  या झाडांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून येणारा चीक.   सुरवंट तो चीक खातात आणि ते विषारी द्रव्य त्यांच्या शरीरात साठवतात आणि त्या मुळे ही फुलपाखरे विषारी बनतात. पक्षी, सरडे वगैरे कोणी यांना पकडले तरी शरीरास असणाऱ्या उग्र वासामुळे  ते यांना     लगेच सोडून देतात. इतर फुलपाखरं या फुलपाखरांची नक्कल करतात आणि विषारी असल्याचा आव आणत स्वतःचा  रक्षण करतात. सुरवंट देखील मायावरण (camouflage) व अनुकारिता (Mimicry) चा वापर करतात. काही सुरवंट पक्षी विष्ठे सारखे दिसतात तर काही झाडाच्या पानासारखे, खोडासारखे दिसतात. अखाद्य प्रजाती या चमकदार आणि विषारी असतात. फुलपाखरां मध्ये अनुकारीतेचे दोन प्रकार आहेत – Batesian Mimicry (बिनविषारी फुलपाखरे विषारी फुलपाखरांची नक्कल करतात) आणि Mullerian Mimicry (फुलपाखरं एकमेकांची नक्कल करतात).

पुढच्या वेळेस घरच्या कढीपत्त्यावर, लिंबावर,जर पक्षी विष्ठे सारखा काही दिसला तर लगेच काढून टाकू नका…तुमच्या घरीच एका सुरवंटाचे फुलपाखरू होताना तुम्हाला बघायला मिळेल.

डॉ. अंकूर पटवर्धन (९८२३८१२६५३), डॉ. तेजस्विनी पाचपोर (७७७४०७५०३१)

Share on facebook
Facebook
Share on whatsapp
WhatsApp
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on tumblr
Tumblr
Share on print
Print
Share on email
Email